सिंधुदुर्ग : कणकवली गावठाण येथील अजय गुरव या तरुणाचा घातपात झाला असावा, असा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. अजय याला त्याच्या मित्रानी घरातून बोलावून नेले होते. त्यानंतर तो घरीच आला नाही. तो बेपत्ता झाला. मात्र, काही दिवसांनी त्याचा मृतदेह नदी पात्रात सापडला. याबाबत अजयच्या नातेवाईकांनी घातपाताची शक्यता वर्तविली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१३ मे २०१९ रोजी मित्रांनी अजय गुरव याला बोलावून नेले. घरातून बाहेर पडलेल्या अजय विजय गुरव याला त्याच्या दोन मित्रांनी बोलावून घेतले होते. पण त्यानंतर अजय घरी आलाच नाही. मात्र, त्याचा मृतदेह नदीपात्रात आढळला होता. याचा घातपात झाल्याचा संशय त्याची आई निकिता गुरव आणि वडील विजय गुरव यांनी व्यक्त केला आहे.


याबाबत त्याच्या मित्रांकडे चौकशी केली असता अजय आमच्यासोबत नव्हता, असे त्यांनी सांगितले. पण गावातील एकाने त्या तिघांना एकत्र बघितल्याचे सांगितले. या दोघांनी दिलेल्या कारणांमध्ये तफावत आढळून आली असल्याची माहिती आई-वडिलांनी दिली. हा घातपात असल्याचा संशय अजयच्या आई-वडिलांनी तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. शिवाय पोलीस तपास यंत्रणा हा तपास नीट करत नसून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अजयच्या आई-वडिलांनी केला आहे. आम्हाला आणि अजयला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.