प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : सगळ्यांनाच काहीतरी छंद असतो... सिंधुदुर्गातल्या अभिषेक नार्वेकरलाही असाच छंद. आपल्या छंदापायी त्याने नोकरीही सोडली आणि सायकलवरून देशभर भ्रमंती करायला सुरुवात केली. पाहूयात त्याच्याबाबतचे हे खास वृत्त....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिषेक नार्वेकर... सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबोलीत राहणारा सायकलवीर... देशाच्या कोस्टल भागातून तब्बल ८ हजार किलोमीटरची परिक्रमा करण्यासाठी तो निघालाय. स्वच्छ भारत अभियानाच्या जनजागृतीसाठी तसंच समुद्रकिनाऱ्याशेजारच्या हायवेवरील दुर्लक्षित गावं माहिती करुन घेण्यासाठी हा अवलिया सध्या प्रवास करतोय. दररोज 100 किलोमीटरचा प्रवास करण्याचा अभिषेकचा संकल्प आहे.


अभिषेकने आत्तापर्यंत  २५०० किलोमीटर प्रवास केलाय. भल्या पहाटे प्रवासाला सुरुवात करायची...वाटेत भेटेल त्याठिकाणी रहायचं, जेवायचं, तिथली संस्कृती समजून घ्यायची आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला लागायचं असा त्याचा दररोजचा दिनक्रम आहे. याआधीही अभिषेकनं मनाली ते श्रीनगरपर्यंतचा प्रवास सायकलनंच केला आहे. पाकिस्तानच्या बॉर्डरपासून लखपतपासून हा प्रवास सुरू झालाय. त्याचा पहिला टप्पा कन्याकुमारीपर्यंतचा आहे. आणि त्यानंतर बांग्लादेशच्या सुंदरबनजवळ बखारी इथं प्रवासाची सांगता होणारेय. अभिषेकला त्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा...