सिंधुदूर्ग | कसा ओळखायचा `देवगड हापूस आंबा` ?
हापूस अंब्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती
सिंधुदुर्ग: हापूस म्हटलं की सिंधुदुर्ग, कुडाळ, मालवण, रत्नागिरी अशी ठिकाणं आपल्या डोळ्यासमोर येतील. मात्र हाच रत्नागिरीचा हापूस चक्क दुबईतही झाडांना लगडलेला पहायला मिळतोय. आपण हे झाडं पाहता आहात हे झाड दुबईतील असून या झाडाला हापूस लागलेले पहायला मिळताहेत. रत्नागिरीतील खेडचे भूमिपुत्र बशीर अजवानी हे व्यवसायानिमित्त दुबई इथं स्थायिक झाले आहेत. मात्र आपल्या मातीशी त्यांची नाळ अजूनही जुळलेलीच आहे. दुबई इथं त्यांनी हापूस आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. यासाठी त्यांनी खास हापूसचं रोपं कोकणातून दुबईला घेऊन गेले होते. हापूस पिकवण्यासाठी दुबईची माती योग्य नव्हती. म्हणून त्यांनी चक्क खेडमधून तीन कंटेनर माती दुबईला नेली आणि झाडांचं योग्यरित्या संगोपन केलं. 12 वर्षांपूर्वी लावलेल्या या झाडांना आलेले हापूस पाहून त्यांच्या कुटुंबाना कोकणात रहात असल्याचं अनुभव येत आहे. गेली दोन वर्ष ते हापूस आंब्यांचं उप्तादन घेत आहेत हे विशेष...