मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिंधुताईंच्या निधनाने अनेकजण पोरके झाले. संपूर्ण महाराष्ट्राने सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येकला 'बाळा' म्हणून हाक मारणाऱ्या सिंधुताई अनेकांची माय होत्या. जन्म न देता त्यांनी अनेक अनाथ बालकांना त्यांनी आईची माया दिली. म्हणून त्या सगळ्यांच्या "माई'' होत्या. माईंना अखेरच्या क्षणी कोणाची काळजी होती. तर ती म्हणजे आपल्या पिल्लांची. 


हे होते सिंधुताईंचे अखेरचे शब्द 


'माझी मुले कशी आहेत. माझ्या मुलांची काळजी घ्या,'हे होते सिंधुताई सपकाळ यांचे अखेरचे शब्द. अखेरच्या क्षणी देखील त्या माईला काळजी होती ती आपल्या पिल्लांची.. शेवटच्या क्षणी देखील मुलांचीच काळजी सिंधुताई सपकाळ यांना होती. 


पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली 



' डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे समाजसेवेतील योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या. त्यांना सन्मार्ग दाखवला. त्यांचे आयुष्य घडवले. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव असे काम केले. त्यांच्या निधनाने मला व्यक्तीश: अतीव दु:ख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ॐ शांती', अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो फोटोही पंतप्रधानांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.