मुंबई : Pune-Mumbai Sinhagad Express : पुणे-मुंबई सिंहगड एक्स्प्रेस (Sinhagad Express) पुन्हा एकदा सोमवारपासून धावणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवासी ही गाडी सुरू करण्याची मागणी करत होते. ही गाडी पुणे स्थानकावरून सकाळी 6 वाजून 5 मिनिटांनी निघेल. मुंबईला 9 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल. मुंबईहून संध्याकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी निघेल पुण्याला रात्री 9 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. प्रवाशांना लवकरच आरक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, आता इव्हेट्रान्स कंपनीची इलेक्ट्रिक बस (electric bus) पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर (pune-mumbai highway) बुधवारपासून सुरु करण्यात आली आहे. पुणे ते मुंबई दरम्यान पुरी बस नावाने आंतर-शहर बस सेवा सुरू केली आहे. आंतर-शहर सेवा भारतात प्रथमच सुरू करण्यात आली असून, 15 ऑक्टोबर विजयादशमीच्या (dassehra) शुभ मुहूर्तापासून बसच्या नियमीत प्रवासफेऱ्या (Bus trips) सुरू केल्या जाणार आहे. याचा प्रवास हा शून्य-उत्सर्जन, ध्वनीप्रदुषणाविना आणि आरामदायक (luxurious bus) अणार आहे.


मुंबई- पुणे दरम्यान विशेष गाड्या 


मध्य रेल्वेने मुंबई आणि पुणे दरम्यान खालील तपशीलांनुसार विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे:


01009 विशेष दि. 18-10-2021 पासून पुढील सूचनेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज १७.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी 21.50 वाजता पुण्यात पोहोचेल.


01010 ही विशेष गाडी दि. 18-10-2021 पासून पुढील सुचनेपर्यंत दररोज 6.5 वाजता पुणे येथून सुटेल आणि त्याच दिवशी ०९.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल.


या गाडीला थांबे - दादर, ठाणे (फक्त 01009 साठी), कल्याण, कर्जत, लोणावळा, चिंचवड, पिंपरी, खडकी आणि शिवाजी नगर असे असणार आहेत.


आरक्षण: 01009 आणि 01010 सामान्य शुल्कासह बुकिंग 15-10-2021 रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.


तसेच अतिजलद विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा.कन्फर्म तिकिटे असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी असेल व त्यांना बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड-19 संबंधित सर्व नियम, एसओपीचे पालन करणे अनिवार्य असेल, असे रेल्वेकडून कळविण्यात आले आहे.