दिनेश दुखंडे, झी मीडिया, सिन्नर : महाराष्ट्रात एक असा ढाबा आहे की ज्याच्या जेवणाचे खुद्द मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान चाहते आहेत. वर्षातून किमान एकदा तरी ते या ढाब्यावर येतात...पाहुयात कुठे आहे हा ढाबा...


कुठे आहे हा ढाबा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिर्डी-सिन्नर रोडवर असलेला हा तुलसी ढाबा...सिन्नर तहसील कार्यालयापासून पुढे शिर्डीच्या दिशेनं जाताना सात-आठ किलोमीटर अंतर कापल्यावर उजव्या हाताला हा ढाबा लागतो...सिन्नरमध्ये कुणाला जेवणासाठी चांगला ढाबा विचारला तर त्याच्या तोंडून तुलसी ढाब्याचचं नाव येतं...मूळचे शेतकरी असलेले सुदाम गुरुळे यांनी सतरा वर्षांपूर्वी हा ढाबा सुरु केला.


मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कसे आले इथे?


शिर्डीला पायी चालत येणाऱ्या भाविकांना फार पूर्वी ते साईंची सेवा म्हणून कधी मोफत तर कधी कमी दरात चहा-नाश्त्याची सोय उपलब्ध करून देत असतं. तेव्हा एक छोटसं खोपटं होतं, पण त्याचं नंतर ढाब्यात रूपांतर झालं...मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हेही साई भक्त...पाच वर्षांपूर्वी ३१ डिसेंबरला ते या रस्त्यानं शिर्डीला जात असतांना तुलसी ढाब्यावर नाश्त्यासाठी थांबले...आणि या ढाब्याचे चाहातेच बनले...त्यानंतर प्रत्येक वर्षी याच दिवशी ते शिर्डीला आल्यानंतर या ढाब्यावर आवर्जून येतात...या ढाब्यावरची कांदाभजी, कोथंबीरीचं थालीपीठ, वांग्याचं भरीत, चणा-उडीद डाळ हे पदार्थ चौहान यांना विशेष आवडतात.