नाशिक : नाशिक शहरात महिलेची रिक्षातच प्रसूती प्रकरणाची आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणी दोषी 6 कर्मचा-यांचं निलंबन करण्यात आलय. दिंडोरी रोडवरील पालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात नर्स, कर्मचारी, आया आणि डॉक्टरही उपस्थित नव्हते. त्याचवेळी प्रसूती कळा सहन न झाल्यानं श्रेया साकेत या महिलेची भररस्त्यात रिक्षातच प्रसूती झाली होती. याबाबतचं वृत्त झी 24 तासनं सोमवारी रात्री प्रसारीत केलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणाची नाशिक पालिकेच्या आरोग्य विभागानं गंभीर दखल घेत रात्री उशिरा वैद्यकीय अधिका-यांसह 5 परिचारिकांना निलंबित केलं. महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक कार्यालयानं या घटनेची चौकशी केली. त्यानुसार डॉक्टर हिरामण कोकणी, यांच्यासह इन्चार्ज सिस्टर सरला रुपवते, स्टाफ परिचारिका मनिषा शिंदे, एम एम ठाकूर, भारती कोठारी, श्रीमती  देशमुख यांना निलंबित करण्यात आलंय. तर हंगामी सुरक्षा रक्षक भरत गायकवाड आणि लक्ष्मी निकम यांना बडतर्फ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.