शिर्डी : महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. शिर्डी नॅशनल ऍडव्हेंचर फॉन्डेशन चॅप्टरच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका साहसी खेळात सहा महिन्याच्या गरोदर तारकेश्वरी राठोड हिने अनोखी कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांच्यासोबत पॅरामोटरमध्ये बसून तारकेश्वरीने मराठमोळा पोशाख घालत तब्बल दोन हजार पाचशे फूट उंच आणि अकरा किलोमीटर लांब हवेतून साहसी भ्रमंती केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरोदरपणाच्या सुरवातीच्या काळात त्यांना शक्य झालं नव्हतं. मात्र डॉक्टरांच्या सल्ला घेत तारकेश्वरी हिने महिला दिनानिमित्त आपली इच्छा पूर्ण केली. महिला कोणत्याही अवस्थेत साहस करू शकते असा संदेश जगाला दिला.


आज जगभरात जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविध राज्यात महिला दिनानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. 


दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना शुभेच्छा दिल्या. मोदींनी यापूर्वी घोषणा केल्याप्रमाणे आज ते महिलादिनानिमित्त स्वत:च्या सोशल मीडियाचे सारथ्य महिलांकडे सोपवणार आहेत. सात कर्तृत्ववान महिलांना मोदींच्या सोशल मीडियावर स्वत:चे विचार मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. नारीशक्तीची भावना आणि महिलांच्या कर्तृत्वाला आम्ही सलाम करतो, असं म्हणत मोदींनी ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. तर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नारीशक्ती पुरस्काराने गौरव केला.