मुंबई : मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्यांना संधी न देता पक्षाने तीन अपक्ष आमदारांना संधी दिल्याने हा नाराजीचा सूर आहे. एकीकडे मुंबईतून सुनील राऊत यांना संधी न मिळाल्याने ते नाराज आहेत. तर दुसरीकडे कोल्हापूरातून प्रकाश आबिटकर, मराठवाड्यातून परभणीचे राहूल पाटील, उस्मानाबादमधील भूम परंडाचे आमदार तानाजी सावंत, कोकणातून सहा वेळा आमदार असलेल्या गुहागरचे भास्कर जाधव, विदर्भातील रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल यांना संधी देण्यात आलेली नाही. उघडपणे हे आमदार नाराजी व्यक्त करत नसले तरी पक्षांतर्गत मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचा सूर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून शिवसेनेच्या कोट्यातून अपक्षांना दिलेल्या मंत्रिपदांबाबत काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अपक्षांना संधी दिल्यामुळे मूळ शिवसैनिकांची संधी हुकल्याचं सामानातून अधोरेखित करण्यात आलं आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पक्षातील नाराज नेत्यांची समजूत कशी काढता हे पाहावं लागणार आहे.


निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजप आणि नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या अब्दुल सत्तारांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच मंत्री झाले आहेत.