सोनू भिडे, नाशिक:  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन नगरी असलेल्या इगतपुरीत जळालेल्या अवस्थेत एक कार आणि त्यामध्ये मृतदेह आढळून आला आहे. सुप्रसिद्ध भावली धरणाच्या पुढच्या बाजूला आंबेवाडी परिसरात ही कार आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हि घटना सोमवारी रात्री घडली असून हा अपघात की घातपात या चर्चेला उधाण आल आहे. तर पुन्हा एकदा महापालिकेतील डॉ सुवर्णा वाजे प्रकरणाची पुनरावृत्ती झाली नाही ना अशी शंका यामध्ये व्यक्त केली जात आहे. 


काय आहे घटना 


नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला छोटे काश्मीर म्हटले जाते. याठिकाणी  भावली परिसरात पावसाळ्यात विकेंडला पर्यटकांची मोठी गर्दी असते. यापुढे भंडारदरा रस्त्यावर काही अंतरावर  आंबेवाडी हे गाव आहे. या या गावांमध्ये साधी मोबाईलची सुद्धा रेंज नाही आणि अशाच गावातील या रस्त्यावर स्थानिक सरपंचाला आज सकाळी गाव नजीक एक जळालेली कार दिसून आली. या याबाबत त्यांनी घोटी पोलीस ठाण्यात माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इगतपुरी पोलीस ठाण्याचे पथक  घटना स्थळी दाखल झाले. पोलिसांनी भेट दिली असता तिथे एक कार संपूर्णपणे जाळून खाक झाली होती. आणि या कारमध्ये एक जळालेला मृतदेहाचा सांगाडा सुद्धा पोलिसांना मिळून आला आहे. 
कारमध्ये मिळून आलेला मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने मृतदेह स्त्रीचा आहे की पुरुषाचा यासंदर्भात अद्याप कुठलीही माहिती मिळू शकलेली नाही. तर मृतदेह फोरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. घोटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 


घटनेचा तपास सुरु


घटनास्थळी मिळालेली कार जळून खाक झाली असून गाडीचा फक्त सांगाडा शिल्लक राहिला आहे. या गाडीचे दोनही बाजूचे नंबर प्लेट जळल्या असल्याने गाडीची सुद्धा ओळख पटू शकलेली नाही. या करिता पोलिसांनी नाशिकच्या आर टी ओ विभागाला पाचारण केले आहे. आर टीओ च्या माध्यमातून गाडीची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून गाडीचा शोध घेतला जात आहे. इथे मोबाईलची सुद्धा रेंज नसल्यामुळे मोबाईल टॉवरचा वापर करून लोकेशन शोधणे सुद्धा अवघड बनले आहे. इगतपुरी शहरातील हॉटेलमध्ये सुद्धा तपास सुरु आहे. नुकत्याच झालेल्या वीकेंडला कुणी या हॉटेलमध्ये व रिसॉर्ट मध्ये थांबले होते का याचीही सखोल चौकशी केली जाते आहे


डॉक्टर सुवर्णा वाजे प्रकरणाला उजाळा


इगतपुरी कडे जाणाऱ्या महामार्गावर रायगड नगरच्या जवळ एका निर्जन स्थळी अशाच कारमध्ये एका महिलेचा सांगाडा मिळून आला होता त्यांच्या तपासानंतर त्या डॉक्टर सुवर्णा वाजे असल्याचं समोर आलं होतं त्यांच्या पतीने त्यांची हत्या केल्याचंही ग्रामीण पोलिसांच्या तपासात समोर आल्याने त्यांना अटक करण्यात आली होती आता पुन्हा याच पद्धतीचा वापर करून कुणी कुणाचा खून तर केला नाही ना असा संशय लोकांमध्ये निर्माण झाला आहे सह्याद्री डोंगर रांगांमधील निर्जन परिसराचा वापर करून पर्यटनासाठी येऊन विशिष्ट ध्येय साध्य करण्याचे प्रकार वाढताना दिसतात.