सोलापूर : पावसानं पाठ फिरवल्यामुळे सरकारनं कृत्रिम पावसाचा प्रयोग करायचं ठरवलं खरं... पण सोलापुरात कृत्रिम पावसाचा या मोसमातला पहिलाच प्रयोग सपशेल फसलाय. विमानानं तब्बल दोनशे किलोमीटर घिरट्या घालूनही पाऊस पाडण्यासाठी पोषक ढग न आढळल्यामुळे हा प्रयोग थांबवण्यात आला. त्यामुळे सोलापूरकरांचा हिरमोड झालाय. कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकराच्यावतीने सोलापुरात उभारण्यात आलेल्या निरीक्षण केंद्रावरुन पहिलं टेस्ट फ्लाईटचं उड्डाण करण्यात आलं होतं. सोलापुरातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये मागील दोन-तीन वर्षांपासून कृत्रिम पावसाच्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र स्थापन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महत्त्वाचं म्हणजे, राज्यात सोलापूर, औरंगाबाद आणि शेगाव या तीन ठिकाणी कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी राज्य सरकारनं ३० कोटी रुपयांची तरतूदही केलीय. सोलापूरसोबतच औरंगाबादमध्येही यासाठी एक रडार यंत्रणा उभारण्यात आलीय. 


यापूर्वी २००३, २००४, २०१० आणि २०११ मध्येही महाराष्ट्रात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आले. मात्र यातला कुठलाही प्रयोग यशस्वी झालेला नाही.