Barshi Scam : सोलापुरातील बार्शीतल्या शेकडो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला विशाल फटे (Vishal Phate) पहिल्यांदाच समोर आला आहे. युट्यूबवर व्हिडीओ शेअर करत विशाल फटेनं आपल्यावर लावलेले आरोप फेटाळले आहेत. मी 200 कोटींचा घोटाळा केला नाही, कुणालाही फसवलं नसल्याचा दावा विशाल फटेनं केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसंच कुठेही पळून गेलो नसून, आजच पोलिसांसमोर हजर होणार असल्याचं फटेनं म्हटलं आहे. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये विशाल फटेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. मात्र, आता विशाल फटे पोलिसांत हजर राहणार का...? कोट्यवधींची फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळणार का...? हाच मोठा प्रश्न आहे.


विशाल फटेने व्हिडिओ बनवून केला युट्यूबवर अपलोड


विशाल फटेने स्वतःचा व्हिडीओ बनवून युट्युबर अपलोड केला आह यात त्याने म्हटलं आहे. मला कुणाचे पैसे बुडवायचे नव्हते, मला जर पळूनच जायचं असतं तर मी माझ्या अकाऊंटमधले सर्व पैसे घेऊन पळालो असतो, माझ्या अकाऊंटवर मी 2 कोटी शिल्लक ठेवले होते. नंतर ते बेकायदेशीररित्या काढण्यात आले ज्यांनी माझ्या खात्यातील पैडे काढले त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करेन.


मला पुढे फसवण्यात आल्यामुळे मी हा निर्णय घेतला, पैसे ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी दीपक आंबरेच्या अकाऊंटवर पैसे मागवले, त्याच्या अकाऊंटवर एवढ्या एन्ट्री आहेत की तोच मला 2 ते 3 कोटींचं देणं लागतो, तो म्हणतो मला पैसे काढून दिले पण त्याचे काही पुरावे नाहीत.  10 लाखांचे 6 कोटी करण्याचा मी जेन्यून प्रयत्न करत होतो.


माझ्याबद्दल काहीही अफवा पसरवण्यात आल्या, माझ्यासोबत एक अपघात घडला मात्र त्यातून मला बाहेर निघता आले नाही. मला पळून जायचं असत तर मी बार्शीत असेट्स निर्माण केले नसते. माझी देखील फसवणूक झाली, माझ्या लेव्हलवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होतो. 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ ज्यांचे पैसे माझ्याकडे होते त्यांना कधीच परत देऊन टाकलेत. महिन्याला कमीत कमी 8 ते 9 टक्के रिटन दिले


200 कोटी रुपयांचा आकडा कुठून आला, 10 ते12 कोटींच्या पुढे आकडा जाणार नाही. मागच्या तीन महिन्यात नवीन एकही गुंतवणूक घेतलेली नाही. माझ्याकडून काही चुका झाल्या त्याचे परिणाम भोगण्यासाठी मी तयार आहे. त्यासाठी तुरुंगात देखील जाण्याची माझी तयारी आहे. 


परिवाराला माझ्या व्यवसायाबद्दल काहीही माहिती नाही. वडिलांचे बँक खाते मीच वापरत होतो. सर्वांचे मुद्दल परत केलेले आहेत, मुद्दल अडकलेले केवळ 10 ते 12 लोक असतील. पैसे जास्त मिळवण्याच्या नादात मी अनेक मार्गद्वारे पैसे गुंतवले, त्यातून पैसे अडकत गेले


उदभवलेल्या सर्व परिस्थितिला मी एकटा जबाबदार आहे. पळून जाण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता पोलिसांनी गुन्हे दाखल करताना शहानिशा केलेली नाही पोलिसांनी तपास करावा, मी कुणाला किती परतावा दिला आहे याची देखील माहिती द्यावी. आज संध्याकळी मी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये हजर होणार. मला काहीही शिक्षा झाली तरी मी सर्वांचे पैसे परत करेन


माझ्या मनात आत्महत्येचे विचार आले होते, मला जितका वेळ हवा होता गोष्टी मॅनेज करण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. माझ्या परिवाराचा यात काहीही संबंध नाही, असं विशाल फटे याने या व्हिडिओत म्हटलं आहे.


नेमकं प्रकरण काय?
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या बार्शीतील विशाल फटे याने शेअर्स मार्केटमध्ये शेअर्स घेण्याकरिता मोठ्या रकमा स्थापन केलेल्या तीन कंपन्यांच्या नावावर घेत गुंतवणूकदारांना आकर्षक परतावा देण्याचं आमिष दाखवत होता. यासाठी विशाल फटे  गुंतवणकदारांकडून आरटीजीएस, धनादेश, तसंच रोख रक्कम घेत होता. ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून नफा मिळवून देण्याचं आमिषही त्याने दाखवलं होतं. या आमिषाला बळी पडून अनेकांनी त्याच्या तीन कंपन्यांच्या खात्यात गुंतवणूक केली होती. 


या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून हा आकडा कोट्यवधींच्या घरात आहे.