Solapur Crime News:  सध्या अनेकजण ऑनलाईन फसवणुकीला अनेकजण बळी पडत आहेत. त्यातच आता फेसबुकच्या माध्यमातून पोलिस आयुक्तांच्या मित्रांकडून पैसे उकळण्यात आले आहेत. सोलापुरमधे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सध्या  सायबर पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.   


आरोपीनं आयुक्तांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरातील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून मोठी फसवणूक केल्याचं समोर आले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांच्या नावाने बनावट अकाऊंट तयार करण्यात आले. आरोपीनं आयुक्तांच्या मित्रांकडे पैशांची मागणी केली. पुण्यातील एका मित्रानं 60 हजार रुपये पाठवून दिले. आणखी पैशांची मागणी होत असल्यानं त्या मित्रानं दीपक आर्वे यांना फोन लावला. आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पुणे सायबर पोलिसांत या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.


ज्वेलर्सनं शेकडो ग्राहकांना लाखोंचा गंडा घातला


जास्त व्याजाच्या लोभानं फसवणूक होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता डोंबिवलीतील गुडविन ज्वेलर्सनं शेकडो ग्राहकांना लाखोंचा गंडा घातल्याचं समोर आले आहे. गुडविनच्या डोंबिवलीमध्ये दोन शाखा आहेत. दुप्पट पैशांचं आमिष दाखवून या ज्वेलर्सनं शकडो ग्राहांकडून पैसे गोळा केले आहेत. 21 ऑक्टोबरला दुकान दोन दिवस बंद राहिल अशी पाटी दुकानाबाहेर लावण्यात आली होती. मात्र, आता सात दिवसांनंतरही दुकान उघडलेलं नाही. भिशी, फिक्स डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट्स यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक ग्राहकांनी केली होती. त्यामुळे शेकडो ग्राहकांच्या तोंडचं पाणी पळाले. गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या शोधासाठी घरी पोलीस पाठवण्यात आले. मात्र, ते घर रिकामं करून गायब झाल्याचं समोर आले. जास्त परतावा देण्याचं आमिष दाखवून फसवणुकीचे प्रकार वारंवार घडतात. याबाबत नागरिकांनीच जागरुक असणं गरजेचं आहे. 


विना परवाना खत विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल 


गोंदिया जिल्ह्यातील मुंडीपार आणि हेटी येथे विना परवाना खत विक्री करीत असलेल्या दोन इसमांवर कृषी विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. गोपनीय माहिती कृषी विभागाच्या भरारी पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारावर कृषि विभागाच्या भरारी पथकाने टेकराम कटरे रा. मुंडीपार येथे 80 बॅग भु-वर्धन ऑरगॅनिक खत, तर मंगरु मेश्राम रा. हेटी येथून 70 बॅग भु-वर्धन ऑरगॅनिक खत जप्त केला आहे. एकुण 1,93,500/- रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.