भाजपा खासदाराने महिलांसमोर सांगितला गुप्तांगाचा किस्सा
समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले.
सोलापूर : सोलापूर चे खासदार शरद बनसोडे यांनी भारी सभेत आपल्या अकलेचे तारे तोडलेत. खासदारांनी एका सार्वजनिक व्यासपीठावर स्वतः सहित पक्षाची अब्रू अक्षरशः वेशीवर टांगल्याचा प्रकार पहायला मिळाला. यावेळी भाजप खासदार शरद बनसोडे यांनी सभा संकेत सोडून स्वानुभवाचे प्रसंग सांगताना समोर बसलेल्या महिला आणि ज्येष्ठांचा विचार न करता गुप्तांगाबाबतचा किस्सा सांगून स्वतःचे हसू करुन घेतले.
जन्मगावातचं हसं
विशेष म्हणजे खासदार बनसोडे यांच्या जन्मगावातच हा प्रकार पहायला मिळालाय. या किस्स्यानंतर गावातील नागरिक आणि महिलांनी खासदारांचे भाषण थांबवले. पानमंगरुळ गावातील डॉ. अशोक हिप्परगी यांच्या एकसष्टी कार्यक्रमानिमित्त ते आले होते.