Viral News : सोलापुरातील जुळ्या बहिणींचा एकाच तरुणासोबत ( twin sisters marriage) झालेल्या लग्नाची सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. एकाच नवरदेवानं एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत लग्नगाठ बांधली आहे. पण आता हे लग्न नवरदेवाच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसात अदखपात्र गुन्हा (NCR) दाखल करण्यात आलाय. भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात (Akluj Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केलाय. त्यामुळे आता या नवरदेवावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापुरमधील अकलूज तालुक्यातील माळशिरस इथे अतुल उत्तम अवताडे या तरुणाने पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत लग्न केले आहे. दोघीही तरुणी या उच्च शिक्षित आहेत. या अनोख्या लग्नाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 2 डिसेंबर रोजी अकलूज जवळील गलांडे हॉटेलमध्ये एकाच मांडवात दोन्ही बहिणींचा विवाह पार पडला आहे.


म्हणून एकाच तरुणासोबत केले लग्न


पिंकी आणि रिंकी या मुंबईतील दोन जुळ्या बहिणी आय टी इंजिनियर आहेत. त्यांनी अतुल अवताडेसोबत लग्न केल्याने सध्या दोघेही चर्चेत आल्या आहेत. अतुलचा मुंबईत ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. पिंकी आणि रिंकी या दोघी जुळ्या बहिणींना लहाणपणापासून एकमेकींची सवय आहे. त्या दोघी एकमेकीपासून वेगळं राहू शकत नसल्यामुळे त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.


सहा महिन्यांपूर्वी पिंकी,रिंकी आणि त्यांची आई आजारी पडली होती. त्यावेळी अतुलच्या गाडीतून त्या दवाखान्यात जात असत. अतुलने यावेळी दोन्ही मुलींच्या कुटुंबाची आजारपणात काळजी घेतली आणि त्यांची जवळीक वाढली. केल्यानं त्यांच्यातील जवळीक वाढली होती. अशातच पिंकीला अतुल आवडू लागला. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण दोघीही वेगळ्या राहिल्या नसल्याने त्यांनी एकाच मुलासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघांच्या आईच्या आणि मुलाच्या कुटुंबीयांच्या संमतीने त्यांनी अतुल याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला