ऊस तोडणीसाठी (sugarcane) मजूर (Worker) आणायला गेलेल्या माढ्यातील (madha) बागायतदाराचा महाराष्ट्र- मध्य प्रदेशच्या हद्दीवर खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) परतत असताना बेदम मारहाणीत माढ्यातील प्रशांत महादेव भोसले यांचा मृत्यू झाला आहे. माढा तालुक्यातील बेंबळे येथील प्रशांत महादेव भोसले आपले इतर नातेवाई आणि सहकाऱ्यांसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील एका आदिवासी गावात ऊस तोडणीसाठी मजूर आणण्यास गेले होते. त्यावेळी मजूर घेऊन परतत असताना ही घटना घडली. (solapur Prashant Bhosale dead who went to Madhya Pradesh to bring labor for sugarcane cutting)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रशांत भोसले यांची मध्य प्रदेशातील ऊस तोडणी मजुरांत्या टोळीने निर्घृण हत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली आहे. प्रशांत भोसले हे मध्य प्रदेशातून ऊस तोडणीसाठी मजूर आणण्यासाठी गेले होते. यासाठी एका मुकादामाशी त्यांची चर्चा देखील झाली होती. मजूर आणण्यासाठी प्रशांत भोसले हे नातेवाईक आणि सहकाऱ्यांसह मध्य प्रदेश सीमेवरील एका आदिवासी गावात ऊस तोडणीसाठी मजूर आणण्यास स्कॉर्पिओ गाडीने गेले होते. त्याच्यासोबत मुकादमही होता.


यानंतर पैसे देऊन टेम्पोमधून ते मजुरांची टोळी घेऊन येत होते. प्रशांत भोसले हे मजुरांसह टॅम्पोमध्ये होते व त्यांचे सहकारी स्कॉर्पिओ गाडीत होते. काही वेळाने पुढे गेल्याने स्कॉर्पिओ गाडीवर दगडफेक झाली. त्यामुळे त्यांनी गाडी टॅम्पोच्या पुढे नेली आणि वाट पाहू लागले.


बराच वेळ टेम्पो न आल्याने स्कॉर्पिओमधील सहकाऱ्यांनी भोसले यांना फोन लावला असता फोन बंद आला. त्यामुळे त्यांनी गाडी परत फिरवली. मागे येऊन पाहिले असता प्रशांत भोसले यांना मारहाण झाली आणि ते रस्त्याच्या कडेला पडलेले दिसले. यावेळी ऊस तोड मजूर टेम्पोसह फरार झाले होते.


दरम्यान, प्रशांत भोसले यांना मजुरांनी लोखंडी आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली होती. त्यानंतर त्यांच्याकडील रक्कम लुटली आणि रस्त्याच्या कडेला फेकून दिले.