कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे  : सुखवार्तामध्ये बातमी एका नव्या ऊर्जेची.... या नव्या ऊर्जेची निर्मिती केलीय ठाण्यातल्या एका मंदिरानं.... या विज्ञानयुगातली ही सूर्याची एका प्रकारची आराधनाच..... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज हे मंदिर चर्चेत आलंय ते त्यावर लावलेल्या सौरउर्जेच्या पॅनल्समुळे.... 1990 साली ठाण्यातल्या केरळीय समाजातले काही लोक एकत्र आले आणि इथे मंदिर बांधायचं ठरलं..... पैशांची जमवाजमव होताच अयप्पाचं हे मंदिर प्रत्यक्षात आलं आणि केरळीय समाजातल्या लोकांना अयप्पाचं दर्शन मिळू लागलं.... देवभक्तीबरोबर थोडंसं समाजकार्यही करावं, असं इथल्या ट्रस्टींच्या मनात आलं... त्यातलं पहिलं पाऊल होतं वीजबचतीचं..... त्यासाठी संपूर्ण मंदिरावर 41 सोलर पॅनल्स बसवले... त्यासाठी सा़डे आठ लाखांचा खर्च आला.... मंदिराला लागणारी सगळी वीज याच सौरऊर्जेच्या माध्यमातून वापरली जाते. सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती सुरू होताच महिन्याला ४० हजार रुपयांच्या वीजेची बचत होतेय. 


विशेष म्हणजे या सौरउर्जेपासून जी वीजनिर्मिती केली जाते, त्यातली मंदिराच्या गरजेप्रमाणे वीज वापरुन झाल्यावर, उरलेली वीज MSEB परत केली जाते.  त्यासाठी एक मीटर बसवण्यात आलंय.  त्या मीटरमार्फत ही वीज MSEB ला परत दिली जाते. पावसाळ्यात सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिर्मिती होणं कठीण असतं, त्या काळात MSEB या मंदिराला वीज पुरवणार आहे. 


सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करणारं अयप्पा मंदिर हे ठाण्यातलं एकमेव मंदिर.... इतर मंदिरांनीही वीजबचतीसाठी असाच उपक्रम हाती घेतला, तर तो अनेकांसाठी कल्याणकारी ठरणार आहे. 
देवाच्या भक्तीला सामाजिक कार्याची जोड मिळाली, तर ती भक्ती आणखी सशक्तपणे देवापर्यंत पोहोचते, असं म्हणतात.... अयप्पा मंदिराप्रमाणे सर्वांनीच थोडी वीज वाचवली तर महाराष्ट्रातले काही कोपरे प्रकाशमान होतील. )