जालना : सूनचे प्रेमसंबंध समजात संतापलेल्या सासऱ्याने तिला तिच्या प्रियकरासह ट्रॅक्टरखाली चिरडून मारले.  याप्रकरणी अंबड पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सासरा आणि तिच्या दिराला पोलिसांनी अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या सूनचे प्रेमसंबंध असल्याचे समजताच सासऱ्याला राग आला. या रागातून सासऱ्याने आपल्या मुलाच्या सहकार्याने विधवा सूनेला तिच्या प्रियकरासह ट्रॅक्टरखाली चिरडले. ही घटना जालना जिल्ह्यातील चापडगाव शिवारात घडली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोघांना जणांना अटक केली. 


विधवा सूनेचे प्रेम संबंध असल्याचा राग मनात धरून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या अंगावर सासऱ्याने ट्रॅक्टर घातला. त्यानंतर दुचाकीसह दोघेजण रस्त्यावर पडून जखमी झालेत. दरम्यान, हा अपघात नसून खून असल्याचा आरोप  मृतांच्या  नातेवाईकांनी केला आहे.


त्यानंतर पोलिसांनी सासरा बुथवेल लालझरे आणि दिर विकास लालझरे यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत, अशी माहिती अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली.


6\