प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई : World Senior Citizen Day : ज्येष्ठ नागरिकांसाठी खास खुशखबर. आज 1 ऑक्टोबरपासून सरकार ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल गिफ्ट देणार आहे. काय असणार ही खास भेट, यावर स्पेशल रिपोर्ट. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यंदाच्या 1 ऑक्टोबरला जागतिक ज्येष्ठ नागरिकदिनी (Senior Citizens Day) सरकार खास योजनेचा शुभारंभ करणार आहे. सरकारच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्पेशल एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज सुरू करण्यात येणार आहे. या रोजगार केंद्रात नोंदणी करून 60 वर्षांवरील वयोवृद्ध नागरिकांनाही यापुढे नोकरीची संधी मिळणार आहे. त्यासाठी सरकारच्यावतीने 'सीनियर एबल सिटीजन्स फॉर री-एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी' अर्थात सेक्रेड नावाचे खास पोर्टल सुरू केले जात आहे. (International Senior Citizens Day)


 कशी मिळणार ज्येष्ठांना नोकरी? 


ज्येष्ठ नागरिकांना पोर्टलवर जाऊन आधी नाव नोंदवावे लागेल.विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत त्यांना व्हर्च्युअल इंटरव्ह्यू देता येतील. क्षमता आणि पात्रतेनुसार त्यांना खासगी कंपन्या नोकऱ्या देतील. ज्येष्ठांना नोकऱ्या द्या, असे आवाहन करणारे पत्र सीआयआय, फिक्की, असोचॅम या उद्योजक संघटनांना सरकारने पाठवले आहे. त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी 14567 या नंबरवर टोल फ्री हेल्पलाईन देखील सुरू करण्यात येणार आहे. सरकारच्या या नव्या उपक्रमाचं ज्येष्ठ नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.



2011 च्या जनगणनेनुसार देशात वृद्धांची संख्या सुमारे 10 कोटी 40 लाख होती. 2050 पर्यंत ही संख्या 20 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. वृद्धापकाळात रोजगाराअभावी अनेक वृद्धांचे हाल होतात. मुलांनी पाठ फिरवल्याने म्हातारपणाची काठीही गळून पडते. मात्र रोजगाराच्या या नव्या योजनेमुळे वृद्धांनाही आयुष्याच्या संध्याकाळी सन्मानाने जगण्याची संधी मिळणार आहे.