`हर हर महादेव` सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे.
मुंबई, दि.3 : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रम मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारीत असलेला हर हर महादेव हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. पुढील आठवडयात या सिनेमाचा विशेष शो राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य मंत्री, आमदार तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितले. (Special show of Har Har Mahadev movie Cabinet members will be present nz)
हे ही वाचा - महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
हर हर महादेव सिनेमाची टीम आज मंत्रालयात सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी आली होती. हरहर महादेव सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे सुबोध भावे, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका साकारणारे शरद केळकर, सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अभिजित देशपांडे, सिनेमाचे निर्माते सुनील फडतरे, झी स्टुडिओचे प्रमुख मंगेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा - बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडातील शीना बोरा जिवंत ? कुठे आहे शीना ? मग सापडलेला मृतदेह कोणाचा?
श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अधिकाधिक लोकापर्यंत पोहोचण्यासाठी राज्यभरातील सिनेमागृहात एकाच वेळी हा सिनेमा दाखविण्याचे नियोजन करण्यात येईल. तरुण पिढीला विशेषत: शालेय विद्यार्थ्यांसाठी या विशेष शोचे आयोजन कसे करता येईल याबाबतचे नियोजन करण्यात येईल.
हे ही वाचा - पत्नीला कार शिकवताना विहिरीत पडली कार... पत्नी व मुलीचा मृत्यू...
झी स्टुडिओजची निर्मिती असलेला मराठीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या सिनेमाला एकात्मिक वस्तू/माल आणि सेवा कर यामधून सुट देता येईल का याबाबतही तपासले जाईल.