अहमदनगर : साईभक्तांसाठी खुशखबर आहे. मध्य रेल्वेच्यावतीने उद्यापासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. उद्या रविवारी शिर्डी रेल्वे स्थानकावर प्रवाश्याच्या सोयीसाठीच्या विविध उपक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे.


गाडी क्रमांक २२१४७/ २२१४८  दादर  ते साई नगर शिर्डी शुक्रवारी दादरहून रात्री २१.४५ ला सुटून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता शिर्डीला पोहोचणार शिर्डीहून दादरसाठी ही गाडी शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटून दुपारी ३.२० ला दादरला पोहोचणार आहे.