शिंदे गटात फूट? शिंदे गटाबरोबर गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत, कारण...
शिंदे गटाचे सर्व आमदार, खासद कुटुंबासह उद्या Guwahati जाणार, गुलाबराव पाटील मात्र दौऱ्यापासून दूर... कारण आलं समोर
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्यासह शिंदे गटातील (Shinde Group) मंत्री व आमदार 26 आणि 27 नोव्हेंबराल गुवाहाटी (Guwahati) दौऱ्यावर जाणार आहेत. उद्या म्हणजे 26 तारखेला सर्व शिंदे गट गुवाहाटीसाठी रवाना होतील. 27 नोव्हेंबरला सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदार, खासदार आणि त्यांचे कुटुंबीय प्रसिद्ध कामाख्या देवीचे (Kamakhya devi Temple) दर्शन घेणार आहेत.
गुलाबराव पाटील जाणार नाहीत
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) मात्र शिंदे गटाबरोबर जाणार नसल्याने चर्चा रंगल्या होत्या. यावर गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. जिल्हा दूध संघाची निवडणूक असल्याने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील गुवाहाटीला जाणार नाहीत. निवडणूक असल्याने आपण मुख्यमंत्र्यांना मी विनंती केली असून त्यामुळे मी गुवाहाटी ला जाणार नसून आमचे बाकीचे आमदार जाणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
गुवाहाटी दौऱ्यासाठ विमान बूक
गुवाहाटी दौऱ्याची शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. गुवाहाटीसाठी शिंदे गटाकडून एअर इंडियाचं (Air India) विशेष विमान बूक करण्यात आलं आहे. 180 जणांसाठी विमान बूक करण्यात आलं असून आमदार, खासदार आणि त्यांचं कुटुंबिय गुवाहाटीला जाणार आहेत. 26 आणि 27 असा दोन दिवसांचा गुवाहाटीचा दौरा आहे.
अजित पवार यांचा टोला
शिंदे गटातल्या आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरुनच आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) निशाणा साधलाय. कामाख्या देवीला रेड्यांचा बळी देतात, आता ते कुणाचा बळी देतात काय माहिती असा टोला अजित पवारांनी लगावलाय. कामाख्या देवीच्या दर्शनाला चाललेल्या शिंदे गटाच्या आमदारांना दादांनी शुभेच्छाही दिल्यात.
कामाख्या देवीचा नवस फेडणार
शिंदे गटातील आमदार बच्चू कडू (MLA Bachchu kadu) यांनी काही दिवसांपूर्वीच सर्व आमदार गुवाहाटीला जाणार असल्याचं सांगितलं होतं. आम्ही कामाख्या देवीला नवस केला होता. तो नवस या दौऱ्यात फेडणार आहे. राज्यात दिव्यांग मंत्रालय व्हावं, बळीराजाचं भलं व्हावं, यासाठी कामाख्या देवीला नवस केला होता असं बच्चू कडू यांनी म्हटलं होतं.