नागपूर-राज्यातील पोलीस भरतीमध्ये काही जिल्ह्यात डमी उमेदवारांनी लेखी आणि मैदानी चाचणी परीक्षा दिल्याचं उघडकीस आलं होतं. धक्कादायक म्हणजे डमी उमेदवाराचं हे जाळ राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही आढळून आलं आहे.याप्रकरणी नागपुरातील नवीन कामठी आणि एमआयडीसी तीन उमेदवारांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राज्य राखीव दलाच्या वतीनं शहरातील काही केंद्रावर डिसेंबर 2021  डिसेंबर भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
यात शहरातील दोन केंद्रांवर डमी उमेदवार बसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नवीन कामठी  पोलीस स्टेशनच्या हद्दीतील  केसरीमल पोरवाल कॉलेजच्या केंद्रावर शंकर आदमने याच्या जागेवर डमी उमेदवार परीक्षा देत असल्याचं व्हीडिओ फुटेजमध्ये आढळून आलं. तर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत  प्रियदर्शनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेजच्या केंद्रावर  ऋषिकेश वसू  आणि समाधान दामू यांच्या जागेवर डमी उमेदवारानं परीक्षा दिल्याचं दिसून आलं.या संपूर्ण लेखी परीक्षेचे व्हिडीओ  चित्रिकरण छायाचित्रण सुद्धा करण्यात आले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याप्रकरणी पडताळणी केल्यानंतर पुणे ग्रामीणच्या दौंड पोलिसाच्या हे सत्य समोर आलं.याप्रकरणी घटनास्थळ नागपूरा असल्यानं  नागपुरातील एमआयडीसी आणि नवीन पोलीस स्टेशनमध्ये फसवुणकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.


शहर पोलीस भरती प्रक्रियेतही घोळ


 काही दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस भरती प्रक्रियेतही असाच डमी उमेदवारांचा घोळा समोर आला होता.याप्रकरणी गुन्हे शाखेनं औरंगाबाद येथून अर्जुन सुलाने,जयपाल कंकरवाल आणि तेजस जाधव यां तिघांना अटक केली आहे. शहर पोलीस भरती आणि त्यापाठोपाठ एसआरपीएफ भरती प्रक्रियेतही घोळ आढळून आल्यानं राज्यात विविध शासकीय  भरती प्रक्रियेतेसुद्ध असेच प्रकार घडल्याचा संशय वाढला आहे