मुंबई : SSC and  HSC Exam Update News : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल (SSC and  HSC Exam Update News० जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जुलै- ऑगस्ट 2022 मध्ये राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोकण, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर  या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.


पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झाल आहे. 27 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान दहावीची तर 21 जुलै ते 12 ऑगस्टदरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होणार आहे. दहावी बारावीत अनुत्तीर्ण झालेल्यांची ही परीक्षा आहे. 


परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांत छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करुन घ्यावी आणि परीक्षेस बसावे असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.