दहावीच्या पुस्तकात सत्ताधारी भाजप - शिवसेनेवर स्तुतीसुमनं...
स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे...
मुंबई : महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमानुसार बालभारतीने तयार केलेली नवी पुस्तकं उपलब्ध झाली आहेत. मात्र, यातील आशयाबाबत आक्षेप घेतला जातोय. सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यावर गुणगान उधळणारे काही धडे या पुस्तकातून लहान मुलांच्या मनावर बिंबवण्याचा यातून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होतोय.
राज्य मंडळाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीनं तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये म्युच्युअल फंड्स, शेअर बाजार, जीएसटीसोबत अवयवदान अशा ताज्या घडामोडींची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती पुस्तकात देण्यात आली आहे.
मात्र, त्याचवेळी राज्यशास्त्राच्या पुस्तकात केंद्र आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलंय. तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नेमकं या पुस्तकात काय म्हटलंय पाहुया