Nashik Accident News:  मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गवरील मालेगावच्या मुंगसे गावाजवळ राज्य परिवहन मंडळाच्या बसने मोटार सायकलला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक वृद्ध आजोबा आणि दोन मुलींचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर परिसरात संतप्त वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळं वाहतूक ठप्प झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, आजोबा त्यांच्या दोन्ही नातींनी घेऊन शाळेत निघाले होते. आज शाळेत शेवटचा पेपर होता. शाळेत जात असतानाच बसने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या अपघात इतका भीषण होता की आजोबा आणि एक नात जागीच ठार झाले. तर, एका चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. तिला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आली होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.


पघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केल्याने दुतर्फा वाहतूक ठप्प झाली आहे. पोलीस प्रशासनाने घटना स्थळी धाव घेत ग्रामस्थाची.समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या मार्गांवर मुंगसे गावाजवळ उड्डाण बांधावा तसेच सोमा कंपनी व पालकमंत्री दादा भुसे जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्यावर ग्रामस्थ ठाम आहे.


आजोबांसह नातीचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरातून एकच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शेवटचा पेपर सुरू असताना आणि दुसऱ्या दिवशीपासून सुट्टी सुरू असल्याने मुलीही आनंदात होत्या. मात्र, शाळेत जातानाच असं काही घडेल याची कोणालाच पुसटशीही कल्पना नव्हती. घरातील तीन सदस्यांच्या मृत्यूनंतर घरात शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांना एकच धक्का बसला आहे.