यवतमाळ : वटबोरी गावाजवळ भरधाव एसटी बस विटांनी लादलेल्या ट्रॅक्टरवर धडकल्याने झालेल्या अपघातात बस चालक जागीच ठार झाला आहे. अजय श्रीवास असं मृत बस चालकाचं नाव आहे. या अपघातात बसमधील बसवाहक सीमा डेरे यांच्यासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसमधील जखमींना यवतमाळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या अपघातामुळे यवतमाळ चंद्रपूर मार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.