प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी: ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात लोकल ट्रेनचं (Local Train News Today) महत्त्व आहे त्याप्रमाणेच आपल्या आयुष्यात लाल पिरी म्हणजेच लाल बसही मोठं महत्त्व आहे. लहाणपणी आपण या लाल परीनं खुपदा गावाला गेलो असू. कोकणात जाण्यासाठी किंवा महाराष्ट्रात कुठेही जाण्यासाठी आपण लाल पिरीचा उपयोग करतोच करतो. आता आपल्यालाही माहितीये की एसटी संपामुळे लाल पिरीवर एक वेगळेच ग्रहण लागले होते परंतु आता लालपरीची एक खुशखबर तुम्हाला मिळणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्यांची जीवन वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालपरीचे आता मार्गावरील लाईव्ह लोकेशन मिळणार आहे. त्यासाठी रत्नागिरी एसटी विभागाने व्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम (VTS) (व्हीटीएस) ही यंत्रणा सर्व गाड्यांमध्ये बसवण्याचे काम घेतले होते. ते अंतिम टप्प्यातआहे. जिल्ह्यातील 760 एसटीमध्ये व्हिटीएस यंत्रणा बसवण्यात आली आहे. त्यामुळे एसटीचे कोलमडलेले वेळापत्रक सुधारून प्रवाशांना वेळेत एसटी मिळण्यास मदत होणार आहे. एसटी महामंडळानेही आधुनिकतेची कास धरली आहे. 


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


रेल्वेप्रमाणेच सर्वसामान्यांची लालपरीसुद्धा आता हायटेक होणार आहे. एसटी (St Corportion) महामंडळाकडून 'पव्हेईकल ट्रेकिंग सिस्टीम' सर्व एसटीमध्ये बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने एसटीचे लाईव्ह लोकेशन (Live Location) कळणार आहे. रत्नागिरी एसटी विभागात व्हिटीएसचे काम 100 टकके पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील 760 गाड्यांनाही यंत्रणा बसवण्यात आली असून अंतिम चाचणी होणे बाकी आहे. गेली अनेक वर्षे एसटीचे लोकेशन कळावे यासाठी हे व्हिटीएस सिस्टीम बसवण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र कोरोनामुळे (Corona News) हा प्रकल्प मार्गी लागला नव्हता.


हेही वाचा - Video : घराला लागली आग! लग्नासाठी जमवलेले 85 हजार रोख पैसे आणि सोने जळून खाक


जिल्ह्यातील 760 बसेसमध्ये व्हिटीएस सिस्टीम बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम 100 टकके पूर्ण झाले असले तरी केवळ चाचणी घेणे बाकी आहे. संबंधित कंपनीचेअधिकारी याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर लवकरच जिल्ह्यातील बसेसचे लोकेशन एका क्लिकवर बघावयास मिळणार आहे. आज रेल्वेचे लोकेशन (Live Location Railway) कुठेही गेठे तरी कळते त्याचप्रमाणे एसटी कोणत्या मार्गावर आहे, किती वाजता पोहचेल याची माहिती विकसित करण्यात येणाऱ्या ऑपवर मिळणार आहे. 100 टकके हे काम पूर्ण झाले आहे. 


एसटी महामंडळ गेल्या दोनवर्षांमध्ये वेगळ्या आर्थिक संकटात (Economy News) आहे. कोरोनामुळे ठप्प झालेली सार्वजनिक वाहतूक सुरू झाली. ही वाहतूक मूळ पदावर येत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. तब्बळ 5 महिने हा संप सुरू होता. या पाच पहिन्याच्या कालावधीत एसटीच्या हबकाच्या प्रवाशांनी आपला पर्याय शोधला. या सर्व घडामोडीमध्ये एसटीवरील विश्‍वास काम झाला होता; परंतु आता एसटी महामंडळ तेवढ्यात जोमाने प्रवाशांच्या सेवेसाठी उतरली आहे. प्रवाशांचा विश्‍वास मिळवण्यासाठी एसटीची ही. व्हीटीएस (VTS System) यंत्रणा प्रभावी ठरणार आहे.