Maharashtra ST Bus To Ayodhya : प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी इच्छुक असलेल्या महाराष्ट्रातील भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात ST बस  थेट अयोध्येला जाणार आहे. एसटी महामंडळातर्फे अयोध्येसाठी बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या मुळे महाराष्ट्रातील भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिरात राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. अयोध्येतील राम मंदिर खूपच सुंदर आहे. देशभरातून भाविक अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. विविध राज्यातून अयोध्येकरिता खास रेल्वे ट्रेन देखील सोडण्यात येत आहेत. महाराष्ट्रात रेल्वे सह अयोध्येकरिता एसटी बस सेवा देखील सुरु करण्यात आली आहे. धुळ्यापाठोपाठ आता पुण्यातून देखील अयोध्येसाठी एसबस सेवा सुरु करण्यात आली आहे. 


ग्रुपसाठी बुकींग करता येणार एसटी बस


एकत्र ग्रुपने अयोध्येला जाण्याचे प्लनिंग करणाऱ्यांसाठी चांगली योजना आहे. ग्रुपसाठी एसटी बस बुक करता येणार आहे. 45 ते 55 जणांचा एक समूह एकत्र प्रवास करत असेल तर एसटीबस सोडली जाणार आहे.  भाविकांना प्रभू रामचंद्रांचे दर्शन घडवण्यासाठी एसटीने हा उपक्रम हाती घेतला आहे.  पुणे जिल्ह्यातून मागणीनुसार  एटी बसेस सोडल्या जाणार आहेत.  50 जणांचा ग्रुप असेल तर सोयीनुसार आणि मागणीनुसार एसटीची पाहिजे ती बस भक्तांना मिळू शकणार आहे.  अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी प्रती किलोमिटर 56 रुपये भाडे आकारले जाईल. या यात्रेच्या दरम्यान 3 ते 4 मुक्काम असतील. यामुळे  2 ते 3 चालक या बस साठी दिले जातील असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 


धुळ्यातून धावली अयोध्येसाठी राज्यातील पहिली


धुळ्यातून अयोध्येसाठी राज्यातील पहिली महामंडळाची बस सुरु झाली. या बसने 1600 किलोमीटरचा प्रवास केला. परिवहन महामंडळाने प्रवाशांकडून 4 हजार भाडे आकारलय. या बसमध्ये प्रवाशांसाठी विविध सुविधा देण्यात आल्यात. तर 2 चालक तसेच परिवहनचे 2 अधिकारी देखील बसमध्ये होते. 


अयोध्येतील राम मंदिरात व्हीआयपी आणि लाखो भाविक दर्शनासाठी येतायत. त्यांचं दर्शन सुरळीत व्हावं यासाठी जवळपास 947 वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलीय. तसंच राज्यातील 69 जिल्ह्यांतून जवळपास सहा महिन्यांसाठी 15 निरीक्षक, 123 उपनिरीक्षक आणि 809 हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल अयोध्येसाठी उपलब्ध करून देण्यात आलेत.