नांदेड: एसटी कंडक्टरनं गाडीमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. एसटीतील घंटा वाजवण्याच्या दोरीनं गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. 54 वर्षीय संजय जानकर यांनी आज पहाटेच्या सुमारास आयुष्य संपवलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

4 पानांची सुसाईड नोट लिहून जानकर यांनी आत्महत्या केली. ते नांदेडमधील माहूर आगारात कार्यरत होते. त्यांच्याजवळील तिकीटामध्ये मोठी तफावत आढळली होती. त्यामुळे कामावरून आपल्याला काढलं जाईल या भीतीनं धक्कादायक पाऊल उचललं. 


 संजय जानकर यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये परिवहन मंडळाला जबाबदार धरलं आहे. तिकिट काढण्याचे मशीन सतत बिघडतं. त्यामुळे तिकीटांमध्ये तफावत आढळून आली आहे.  काही चूक नसताना निलंबन होईल, समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी आत्महत्या केली.


संजय राठोडांबाबत संजय राऊतांनी केलेलं वक्तव्य खरं होणार?


आपल्या आत्महत्येस राज्य परिवहन मंडळाला जबाबदार धरलं आहे. 90% तिकिट मशीन खराब असल्यानं ते बदलण्याची विनंतीही सुसाइड नोटमधून केली आहे. या घटनेमुळे माहूर बस आगारासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.