ST Employee Salary : बातमी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील. (ST Employees News) जानेवारी संपला आता फेब्रुवारी महिना पण अर्धा संपला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार (MSRTC salary) झालेला नाही. 7 फेब्रुवारीला पगार देणार (ST workers salary) असं एसटी महामंडळाकडून सांगण्यात आलं होतं. पण आज 15 तारीख उजाडली तरी कर्मचाऱ्यांचा खात्यात पैसे पडलेले नाहीत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (Maharashtra State Road Transport Corporation Salaries News)


राज्य सरकारला धडा शिकवण्याचा इशारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसंच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी 25 फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदनाचा इशारा दिला आहे. शिवाय पगार न झाल्यामुळे आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्याला मुख्यमंत्री जबाबदार आहे असं कर्मचारी संघटनेतून सांगण्यात आले आहेत. (ST Employee salary big news Employee warning to Chief Minister Eknath Shinde Govt in marathi)



बैठकीत निर्णय होणार?


सूत्रांच्या माहितीनुसार 16 फेब्रुवारीला म्हणजे उद्या गुरुवारी राज्य सरकार एका बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर निर्णय घेऊ शकत. त्यामुळे या बैठकीकडे सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. जर या बैठकीतही निर्णय झाला नाही तर एसटी कर्मचारी अजून आक्रमक होण्याची भीती आहे.