एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड, सरकारकडून वेतनासाठी मोठा निर्णय
ST employees Salary Hike: अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे.
ST employees Salary Hike: अंगणवाडीसेविकांनंतर आता एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळीदेखील गोड होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने गोड बातमी दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे. सरकारकडून एसटी महामंडळाला मोठी मदत केली जाणार आहे. किती कोटींची आहे ही मदत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
एसटी महामंडळाला दिवाळीपूर्वी वेतनासाठी 378 कोटींची मदत महाराष्ट्र सरकारकडून दिली जाार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.