ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी, सरकारकडून 300 कोटी वितरित
ST Employee Salary News : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी बातमी हाती आली आहे. कर्मचारी संघटनेने नोटीस बजावल्यानंतर सरकार जागे झाले आणि पगारासाठी निधी मंजूर केला आहे.
ST Employees News : राज्यातील 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. (MSRTC salary) एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार आजच होणार आहेत. (Maharashtra State Road Transport Corporation Salaries News) सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 300 कोटी रुपये वितरित केले आहेत. (ST workers salary) त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची संक्रात गोड होणार आहे. (ST Employee Salary News in Marathi)
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेत, संघटनेने उचलले हे मोठे पाऊल
90 हजार एसटी कर्मचारी नाराज
जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार झालेला नव्हता. त्यामुळे एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज होते. त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
कर्मचाऱ्यांचे वेतन लांबणीवर पडले आणि ...
नाराज झालेले एसटी कर्मचारी मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत होते. यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली होती. सरकारकडून अपुरा आणि वेळेवर मिळत नसलेल्या निधीमुळे कर्मचाऱ्यांचं वेतन लांबणीवर पडू लागले आहे. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खदखद होती. अखेर आज राज्य सरकारने तातडीने पावले उचल 300 कोटी रुपये वितरीत केले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराचा मार्ग मोकळा झाला आहे.