छेड काढणाऱ्या एसटी मेकॅनिकची महिलांनी केली धुलाई
एसटी आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या आदील अहमद शेख (रा. जळगाव) या मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानकात चांगला चोप देत धुलाई केली.
जळगाव : एसटी आगारातील यांत्रिक विभागातील भुसावळ येथील प्रशिक्षणार्थी महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या आदील अहमद शेख (रा. जळगाव) या मेकॅनिकची शिवसेनेच्या महिलांनी बसस्थानकात चांगला चोप देत धुलाई केली.
याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शेख विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.पिडीत प्रशिक्षणार्थी महिला परिवारासह भुसावळ येथे वास्तव्यास आहे. २२ रोजी त्यांची जळगाव आगारात मॅकेनिक म्हणून नियुक्ती झाली असून तेथील यांत्रिक विभागात प्रशिक्षण सुरु आहे. यावेळी शेखने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
२५ रोजी पिडीत महिला नेहमीप्रमाणे जळगाव आगारात प्रशिक्षणासाठी आली होती. याच विभागात आदिल अहमद शेख हा कार्यरत आहे. त्याने दुपारी अडीच वाजेच्या सुमारास स्टार्टर वायर कशी लावायची हे सांगत पिडीतेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, अशी माहिती पोलिसांनी दिली.