मुंबई: दुष्काळग्रस्त भागातील तरुण-तरुणींना रोजगार मिळावा यासाठी एसटी महामंडळाची महाभरती होणार होणार आहे. लवकरच ४ हजार २४२ पदांसाठी भरती होणार आहे. चालक आणि वाहक पदांच्या या भरतीसाठी लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केली. या भरतीमध्ये इतर आरक्षणासह मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतल्याचेही रावते यांनी सांगितले. याशिवाय औरंगाबाद स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी ५६० पदे एस.टी महामंडळामार्फत कंत्राटीपद्धतीने भरण्यात येतील. ही भरती दुष्काळग्रस्त भागासाठी असून या पदांसाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय तसेच दुष्काळग्रस्त भागातील उमेदवारांना या पदांच्या परीक्षा शुल्कात ५० टक्क्यांची सवलत देण्यात येणार आहे. ही भरती औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यात होईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ


या सगळ्या जिल्ह्यात चालक आणि वाहक पदाच्या परीक्षा एकाच दिवशी घेतल्या जातील. बीड, लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यातील तरुण उर्वरित ११ ठिकाणी कुठेही उपस्थित राहू शकतील. यापूर्वी एसटी महामंडळाने मे महिन्यात ३०५४ चालक-वाहकांची भरती केली होती. ही भरती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण प्रदेशासाठी होती.