मुंबई : चार दिवस उलटले तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात अजून तोडगा निघालेला नाहीये. आपल्या मागण्यांकडं लक्ष वेधण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मार्गानं आंदोलनं करण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावात किर्तनाच्या माध्यमातून सरकारचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न चोपडा बस आगार कर्मचाऱ्यांनी केला. किर्तनाच्या माध्यमातून सातव्या वेतन आयोगावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.


औरंगाबाद आणि येवल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी मुंडण करून राज्य सरकारचा निषेध केला. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.



दररोज १०० वेळा मरण्यापेक्षा एकदा वाघ होऊन मरू, असा नारा यावेळी आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिला.