एसटी संपामुळे हमालांचेही होतायत हाल
एसटी कर्मचा-यांच्या संपाचा मोठा फटका प्रवाशांबरोबरच आगारात काम करणा-या हमालांनाही बसल्याचं पहायला मिळत आहे.
अलिबाग : एसटी कर्मचा-यांच्या संपाचा मोठा फटका प्रवाशांबरोबरच आगारात काम करणा-या हमालांनाही बसल्याचं पहायला मिळत आहे.
हातावर पोट असलेल्याय हमालांच्या घरी यंदा संपामुळे दिवाळीचा प्रकाश दिसलाच नाही. एसटीच्या अलिबाग आगारात हमाल म्हहणून गेली ४२ वर्षं काम करत असलेले जनार्दन टोळकर, यापैकीच एक आहेत.
कोणतंही निश्चित वेतन नसलेले जनार्दन टोळकर यांना मालाची चढउतार करून जी हमाली मिळते त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा खर्च चालतो. मात्र, संपामुळे जनार्दन टोळकर यांना एका रुपयाचीही कमाई झालेली नाहीये.
दरम्यान एसटी चालक वाहक वडापाव खाऊन दिवस काढताहेत. प्रवाशांच्या तिकीटाचे जमलेले पैसेही प्रशासन त्यांच्याकडून जमा करून घेत नाहीये.