COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांगली : वेतन वाढीच्या मुद्द्याला घेऊन एस टी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून अघोषित संप पुकारला आहे. आज दुसऱ्या दिवशी हा संप सुरू आहे. शुक्रवारी 70% एस टी वाहतूक बंद होती याचा मोठा फटका राज्यभरातील एसटीने वाहतूक करणाऱ्या प्रवाश्यांना बसला आहे. कर्मचाऱ्यांनी कामावर परतावे असे आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल कर्मचाऱ्यांना केले होते. मात्र अद्याप तरी त्याला कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. शुक्रवारी काही कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासना मार्फ़त कारवाई देखील करण्यात आली आहे. त्यामुळे आज हा संप मिटतोय का ? एस टी प्रशासन आणि परिवहन मंत्री यातून कसा तोडगा काढतातय हे पाहावं लागणार आहे. 


एसटी संपामुळे महाराष्ट्रभर प्रवाशांची गैरसोय झाली आहे. एसटी संपामुळे खाजगी वाहन चालकांनी जादा पैसे आकारायला सुरूवात केली आहे. पुणे, औरंगाबाद या ठिकाणी प्रवाशांना जाण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहे. प्रशासन आता कडक कारवाई करत असल्यामुळे हा संप आज मिटतोय का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे.