गणेशोत्सवासाठी एसटीची जय्यत तयारी, कोकणात जाणार २२०० पेक्षा जास्त बस
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीनं जय्यत तयारी केलीय. यावेळी २२ जुलैपासून ऑनलाईन आरक्षण सुरू केलं जाणार आहे.
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी एसटीनं जय्यत तयारी केलीय. यावेळी २२ जुलैपासून ऑनलाईन आरक्षण सुरू केलं जाणार आहे. २२१६ पेक्षा जास्त एसटी गाड्या यावेळी कोकणात सोडणार असल्याचं परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलंय.
२२ जुलैपासून ऑनलाईन आरक्षणाला सुरुवात झाली असली तरी ग्रुप बुकिंगला मात्र १५ जुलैपासून सुरुवात झाली आहे. परतीच्या ग्रुप बुकिंगची सुरुवात २३ जुलैपासून सुरु होणार आहे.
२० ते २४ ऑगस्ट या पहिल्या टप्प्यात एसटी वाहतूक सुरळीत होण्यासाठी मुंबई आणि उपनगरातील बसस्थानके आणि बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत.
कोकणातील महामार्गावर ठिक ठिकाणी 'वाहन दुरुस्ती पथक( ब्रेक डाउन व्हॅन ) तैनात करण्यात येणार असून प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत.