मुंबई : महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झालीय. एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. बहुतांश आगारात कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वसामान्य जनतेचे यामुळे प्रचंड हाल होत आहेत. मुंबईत संपाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. तर पुण्यात ग्रामीण भागातल्या डेपोत संप सुरू आहे. पुणे शहर भागातले तसंच बारामती डेपो बंद होत आहे. नाशिक, नागपूर या शहरातही संपाला जोरदार पाठिंबा मिळालाय. 


एसटी कर्मचा-यांचा संप सुरूच, प्रवाशांचे हाल झाले आहेत.  राज्यभरातील तब्बल 119 डेपो बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. असं असताना खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट देखील सुरू आहे. या प्रकरणावर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.  संपाची कोंडी फोडण्यासाठी सरकार त्रिसदस्यीय समिती स्थापन करणार आहे. 


एस टी कर्मचा-यांचा संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. संपाबाबत हायकोर्टात सुरू असलेली सुनावणी सोमवारी सकाळी 10 पर्यंत स्थगित करण्यात आलीये. शनिवारच्या सुनावणीत कामगारांच्या आत्महत्यांवरून न्यायमुर्ती एस जे काथावाला यांनी राज्य सरकारला सुनावलं. एस टी महामंडळाचं सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवर कर्मचारी ठाम आहेत. आधी कमिटीचा जीआर काढण्याची मागणी संघटनांनी लावून धरलीय. लवकर तोडगा निघाला नाही, तर 100 टक्के कामगार संपावर जातील, असा इशाराही संघटनांनी दिलाय. 


एसटी कामगार संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यातील खराडी या ठिकाणी सुरु आहे. या बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा आणि भूमिका स्पष्ट होईल. मात्र एसटी कामगार संघटना कर्मचा-यांसोबत असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. कर्मचा-यांच्या पाठीशी ठाम असल्याचे एसटी कामगार संघटनचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी झी २४ तासशी बोलताना सांगितलं.