मुंबई : कोरोना महामारीमुळे रखडलेल्या महापालिका निवडणुका लवकरच होणार आहे. सुप्रीम कोर्टाने 2 आठवड्यात राज्य सरकारला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे राज्य सरकारने निवडणूक आयोगासोबत बैठक घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने आज याबाबत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाने महापालिकांना निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी डेडलाईन दिली आहे. 


11 मे - अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करणे


१२ मे - प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यता पाठवावी 


१७ मे - अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी


१७ मे - अंतिम प्रभाग रचना यादी शासन राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. 


राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक , पिपंरी चिंचवड, कल्याण डोंबिवली महापालिकांना निवडणूक आयोगाने पत्र पाठवले आहे. 


सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग अॅक्शन मोडमध्ये आलाय. राज्य शासनानं ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डेटा सादर न केल्यानं या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार आहेत. याप्रकरणी 12 जूनला सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणी होणार आहे.