मुंबई : राज्यात  सर्वत्र लॉकडाऊन जारी केल्यानंतर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व आस्थापना, केंद्र बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. पण शासनाचे नियम धाब्यावर बसवून अनेक केंद्र खुली असल्याचे पाहायला मिळाले. या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने यावर धाडसत्र सुरु ठेवले असून एका दिवसात १०२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.  ‌


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अवैध दारुविक्री, वाहतूक यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू  आहे.  काल एका दिवसात (११ एप्रिल २०२०) राज्यात १०२ गुन्हे नोंदविण्यात आले असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली. ८ वाहने जप्त करण्यात आली असून १६ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


याबरोबरच २४ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पूर्ण लॉकडाऊन कालावधीमध्ये राज्यात २ हजार ३८३ गुन्हे नोंदविण्यात आले असून ९३७ आरोपींना अटक, तर ११५ वाहने जप्त करण्यात आली असून ५ कोटी ७१ लाख  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



इथे करा संपर्क 


तुमच्या परिसरात कुठे अवैध मद्य विक्री, वाहतूक होत असेल तर टोल फ्री क्रमांक १८००८३३३३३३ तर  व्हाट्सअॅप क्रमांक ८४२२००११३३ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २४ तास इथलं नियंत्रण कक्ष खुला असणार आहे. इथे तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते.