कोल्हापूर : राज्य सरकारनं गोकुळ दूध संघाला दणका दिला आहे. सरकारी आदेश डावलत गाईचं दूध खरेदीचा दर कमी केल्या प्रकरणी सरकारनं गोकुळ दूध संघाला नोटीस बजावली आहे. या उल्लंघनासाठी संचालक मंडळ सहा वर्षांसाठी बरखास्त का करु नये अशी विचारणा, पुणे सहकार विभागाच्या विभागीय उपनिबंधकांनी नोटीसद्वारे गोळुळ दूध संघाकडे केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या पूर्वी गोकुळ दूध संघाने शेतकऱ्याला अधिक संकटात घालण्याचा निर्णय घेतला होता. गोकुळने गाईच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची कपात होती.  पूर्वी २८ रुपये ५० पैशांनी खरेदी केले जाणारे गायीचे दूध आता २६ रुपये ५० पैसे केले होते.


दरम्यान, एकीकडे दूध संघाने खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात मात्र कोणतीही वाढ केलेली नाही. अतिरिक्त दुधात वाढ झाल्यामुळे खरेदी दरात कपात करण्यात आल्याचे सांगण्यात आलेय. परंतु ग्राहकांना गायीचे दूध हे ४५ रुपये प्रति लिटर दराने मिळणार आहे. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.