मुंबई : एकीकडे भाजप आणि मनसेकडून दहिहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू असून शासनाने घातलेले निर्बंध झुगारून दहिहंडी साजरी करण्याचा इशारा दिला जातोय. तर दुसरीकडे राज्य सरकारने दहिहंडी साजरी करण्याबाबतच्या मार्गदर्शनक सूचना ( Guidelines for Dahihandi ) जारी केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांमध्ये दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्याता यावे, मानवी मनोरे उभे करून, एकत्र येऊन दहिहंडी उत्सव साजरा करू नये असं स्पष्ट करण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहिहंडीसाठी मार्गदर्शक सूचना


- दहिहंडी उत्सव साधेपणाने घरी पुजा-अर्चा करून साजरा करावा


- सार्वजनिक पुजा अथवा सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये


- दहिहंडी उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा


- गर्दी टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारे दहिहंडी उत्सव एकत्रित येऊन साजरा करू नये


- दहिहंडीसाठी मानवी मनोरे उभारताना शरीराचा संपर्क येत असल्याने कोरोनाचा वेगाने प्रसार होऊ शकतो


- त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मानवी मनोरे उभारून दहिहंडी साजरी करू नये


- त्याऐवजी रक्तदान शिबीरे, आरोग्य शिबीरे असे उपक्रम राबवण्यात यावेत


- केंद्र सरकारनेही दहिहंडी उत्सवात गर्दी झाल्यास कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते असा इशारा दिला आहे