ख्रिसमससाठी राज्य सरकारची नवी नियमावली, बाहेर पडण्याआधी वाचाच
कोरोनाचा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे.
मुंबई : कोरोनाचा नवा व्हायरस अधिक वेगाने पसरत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर संपूर्ण जगात काळजी घेतली जात आहे. अनेक देशांनी यूकेमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. भारताने ही काळजी म्हणून विमानांवर बंदी घातली आहे. ख्रिसमसमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून सरकारने नवी नियमावली ही जाहीर केली आहे. याआधी राज्य सरकारने नाईट कर्फ्यू लागू केले होते.
काय आहे नवी नियमावली
- चर्चेमध्ये एकावेळी केवळ ५० जण प्रार्थनेसाठी उपस्थित राहू शकतात6
- चर्चेमध्ये मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक
- प्रार्थनेपूर्वी चर्चचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक
- चर्चेमध्ये स्तुतीगीत गाण्यासाठी एका वेळी १० गायकांना उपस्थित राहण्यास परवानगी
- चर्चेच्या बाहेर दुकाने, स्टॉल लावण्यास मनाई
- सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर गर्दी करणे टाळावे.