मुंबई : सर्व शिक्षा अभियानातून देण्यात येणा-या शालेय पाठ्यपुस्तक योजनेला लाभ हस्तांतरण योजनेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. 


गरीब पालकांना दिलासा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उशिरा का होईना इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप लवकर होण्यास मदत होणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य आणि गरीब पालकांना दिलासा मिळालाय. यापूर्वी दोनशे रुपयांची पुस्तके खरेदी करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांना तालुक्याच्या गावी जाऊन पुस्तके खरेदी करावी लागत होती. 


सरकार बॅकफुटवर


खरेदीच्या पावत्या दाखविल्यानंतरच पैसे खात्यात जमा होणार होते. यातील तक्रारींचा ओघ सरकारी पातळीवर लक्षात आणून दिल्यानंतर मात्र सरकार बॅकफुटवर आले.