अहमदनगर : हभप किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या एका वक्तव्यामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. एका किर्तनात त्यांनी समतिथीला स्त्रीयांशी संबंध ठेवल्यास मुलगा आणि विषम तिथीला संबंध ठेवल्यास मुलगी होते असे वक्तव्य केले होते. त्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. यादरम्यान इंदुरीकर महाराजांच्या समर्थनार्थ अनेक लोकं पुढे आले आहेत. याबरोबरच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील इंदुरीकर महाराजांचे समर्थन केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी इंदुरीकर महाराजांचं समर्थन केलं आहे. दोन तासांच्या कीर्तनातून एखादा शब्द चुकीचा  जाऊ शकतो अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे. समर्थकांप्रमाणेच बच्चू कडूंनी देखील इंदुरीकर महाराजांच समर्थन केलं आहे.  



इंदुरीकर महाराजांची प्रतिक्रिया 


'गेल्या २६ वर्षात कीर्तनात जे झाले नाही ते गेल्या आठ दिवसात झाले.' असं निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं शिव जयंती निमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत होते. 'मी जे गेले २६ वर्ष बोलतोय तेच आता ही बोलतोय, पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला.' असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. या कीर्तनाला प्रसार माध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती, एवढच नाही तर कोणत्याही प्रकारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.


इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली असून उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. इंदूरीकर महाराजांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. महाराजांच्या याच धड्याविरोधात आता अंनिसनं नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.



इंदूरीकर महाराजांविरोधात तृप्ती देसाईंनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. इंदुरीकरांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी त्याही मंगळवारी नगरमध्ये दाखल होणार आहेत. त्यांना उत्तर देण्यासाठी इंदुरीकर समर्थकांनीही चलो नगर अशी मोहीम हाती घेतली आहे.