दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : एक दिव्यांग व्यक्ती आपलं काम घेऊन विधानभवनात आली असताना राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी त्यांची थेट गेटवर जाऊन भेट घेतली. गुरुवारी विधीमंडळात मराठी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. सहकार आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या कार्यालयातून त्यांना एक चिठ्ठी आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील एका गृहनिर्माण संस्थेसंदर्भात अर्ज घेऊन एक दिव्यांग व्यक्ती विधानभवन गेटवर आली आहे. त्यांना चालताना त्रास होतोय, त्यांना आपणांस भेटायचे आहे. ही चिठ्ठी वाचताच विश्वजीत कदम यांनी विधानपरिषद सभापतींकडे पाच मिनिटं वेळ मागून विधानभवनाचे गेट गाठले. 


दिव्यांग व्यक्ती शिरीष कुलकर्णी यांच्यासोबत गेटवरील खुर्चीतच बसून त्यांचं म्हणणं ऐकलं आणि तात्काळ संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक कार्यवाही करण्यासंदर्भात सुचना केली. 



गेटवर जाऊन डॉ. विश्वजीत कदम यांनी दिव्यांग व्यक्तींबरोबर सुरू असलेली ही चर्चा इथे तैनात असलेले पोलीस आणि इतर लोक कुतहुलाने बघत होते.