Holidays : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद; शिक्षकांनाही 3 दिवसांची सुट्टी
School Holidays : सुट्टीची हवीये, फिरायला जाण्याचा बेत आखताय? शिक्षक आणि विद्यार्थांना सलग सुट्टी मिळतेय. कधी ते पाहाच...
School Holidays : शाळेत असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना सध्या वेध लागले आहेत ते म्हणजे मे महिन्यात मिळणाऱ्या सुट्ट्यांचे. मागील काही वर्षांमध्ये सुट्ट्यांची संकल्पना जरी बदलली असली तरीही या सुट्टीविषयी असणारं कुतूहल काही कमी केलेलं नाही. हीच सुट्टी आता अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे. कारण, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या निर्णयाच्या धर्तीवर शिक्षकांसाठी 15 ते 17 फेब्रुवारी अशी सलग रजा मंजूर करण्यात आली आहे.
निमित्त अधिवेशनाचं...
शाळांना सगल सुट्ट्या असण्याचं कारण ठरत आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचं वार्षिक अधिवेशन. रत्नागिरीमध्ये पार पडत असणाऱ्या या अधिवेशनादरम्यान आओजित कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि इतरही बडे राजकीय नेते उपस्थित असतील.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Government jobs : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी; लाखावर पोहोचला पगार
या अधिवेशनाला शिक्षकांचीही उपस्थिती असेल ज्यामुळं राज्यातील शाळा यावेळी बंद राहणार आहेत. 15 ते 17 फेब्रुवारीदरम्यान अधिवेशनासाठीची सुट्टी आणि त्यानंतर 18 तारखेला महाशिवरात्र, 19 तारखेला रविवार अशी सलग 5 दिवसांची सुट्टी शिक्षकांना मिळणार आहे.
अधिवेशनात महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार चर्चा...
शिक्षण सेवक भरती, पदोन्नती, सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी, शिक्षकांना संरक्षण, शिक्षकांना बदलीमध्ये वाढीव संधी, जुनी पेन्शन योजना या आणि अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर या अधिवेशनामध्ये चर्चाही होणार आहेत.