नाशिक : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभेचा ( Kisan Sabha) राज्यव्यापी वाहन मार्च (Statewide vehicle march) निघणार आहे. दुपारी नाशिक शहरातील गोड मैदानावरून सुमारे वीस हजार शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर हा मोर्चा 25 जानेवारीला धडकणार आहे. तर सर्व राज्यांच्या राजधान्यांमध्ये राजभवनांवर आंदोलन करण्याची हाक संयुक्त किसान मोर्चाने दिली आहे. (Statewide vehicle march in support of the Farmer Protest) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा पाठिंबा व्यापक करण्यासाठी राज्यात अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने आज राज्यव्यापी नाशिक ते मुंबई वाहन मार्चा  काढण्यात येतोय आहे. त्यात राज्यातील २१ जिल्ह्यांतून २० हजारांहून शेतकरी सहभागी होतील. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी, संगमनेर आणि अकोले तालुक्यातtनही मोठ्या प्रमाणात नाशिककडे रवाना होणार आहेत. ठिकठिकाणी आता शेतकरी गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. अकोले येथून निघणाऱ्या मोर्चाच नेतृत्व किसान सभेचे नेते अजीत नवले हे करणार आहेत.  



दरम्यान, केंद्रीय कृषी विधेयक कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ बदलापूर येथे मोर्चा काढण्यात आला. भारतीय जय हिंद पार्टी यांच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. बदलापूर पूर्वेतील खरवई भागातून हा मोर्चाने दिल्लीकडे कूच केली आहे. केंद्रीय कृषी कायदा रद्द करावा, शेतमालाला एकच कायम हमीभाव द्यावा,आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटूंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.